गटविकास अधिकारी यांचे आदर्शवत काम ; नुसते आवाहन नाही तर देणगी देत केली कामाला सुरुवात
करमाळा समाचार
अनेकदा प्रशासनातील अधिकारी येतात आणि जातात. पण ते आले कधी व गेले कधी हे लक्षात सुद्धा येत नाही. त्यातही बर्यापैकी काहीजण आपल्या कामाच्या शैलीतून सर्वांच्या स्मरणात राहतात. तर असेच एक अधिकारी तालुक्याचे सुपुत्र मूळचे घोटी गावचे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे आता तालुक्यात रुजू झाल्यापासून नवनवीन उपक्रम राबवताना दिसत आहेत. ते यापुर्वी जिथे होते तिथेही असे उपक्रम राबवल्यामुळे नावारूपाला आले होते.

या कामामुळे आता तालुक्यात आल्यापासून कमी वेळेत जिल्हा पातळीवर त्यांचे काम हे लक्ष वेधून घेत असल्याने काल झालेल्या कार्यक्रमात स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. कामाच्या माध्यमातून अनेक अधिकारी कामही करतात लोकांकडून कामासाठी पाठपुरावा करावा लागतो. त्यांच्याकडे पैशाची मांडणीही केली जाते. पण एक वेगळेच उदाहरणे सर्वांसमोर मांडले आहे.

मूळचे घोटी गावचे मनोज राऊत यांनी त्यांच्या स्वतः पुढाकार घेऊन सर्व जिल्हा परिषद शाळांच्या भिंतीवर वैज्ञानिकांची फोटो व माहिती लावून वैज्ञानिक जयंती साजरी करण्याबाबत नवा उपक्रम सुरू केला आहे. या नव्या उपक्रमाची सुरुवात करतानाच त्यांनी गावातील पुढारी व हितचिंतकांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला तालुक्यातून प्रतिसादही मिळाला. तर हा उपक्रम जिल्ह्यात राबवावा असे श्री स्वामी यांनीही सुचवले व आवाहन केले आहे.
तर आपल्या मूळ गावी घोटी येथे स्वतः गट विकास अधिकारी राऊत यांनी दहा हजार रुपये वर्गणी देत पुढाकार घेऊन सायन्स वॉल उभारणीचा उपक्रम मार्गी लावण्याचा विचार केला. त्यात गावातील इतर श्री. साहेबराव एकनाथ शेंडे ५००१ /-, श्री. धनाजी ननवरे ५००१, श्री. राजेंद्र भोसले१००१ /-, श्री. भैरवनाथ हरिभाऊ दिवटे १००१ /-, सर्व शिक्षक स्टाफ जि. प. शाळा . घोटी ३३३३३ /- अशी मदत जमा झाली आहे.