मराठा वनवास यात्रेचे टेंभुर्णीत जोरदार स्वागत
करमाळा समाचार -संजय साखरे
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी तुळजापूर ते मुंबई असा जवळपास 500 किलोमीटरचा पायी प्रवास करत निघालेल्यामराठा वनवास यात्रेचे काल टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी टेंभुर्णी शहर व परिसरातील अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहा मे रोजी लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी या यात्रेचे तुळजापूर येथून प्रस्थान झाले असून सहा जून रोजी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेका सोहळ्यादिवशी मजल दरमजल करत ही यात्रा मुंबईवर धडकणार आहे.
मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संविधान आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसे देता येईल याबाबत जनजागृती करत ही यात्रा मार्ग क्रमण करत आहे.
काल यात्रेचा नववा दिवस होता. आज दिनांक 15 रोजी पहाटे पाच वाजता टेम्भूर्णीतून यात्रा पुढे मार्गस्थ होईल. संध्याकाळी ही यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल.
दिनांक 16 रोजी सकाळी नऊ वाजता मराठा वनवास यात्रा इंदापूर येथे असणार असून तिथे सभा आणि पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आयोजक योगेश केदार यांनी दिली आहे.
प्रभू श्रीरामचंद्र यांना केवळ 14 वर्ष वनवास भोगाव लागला परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत वनवास सुरू आहे तो वनवास मिटावा यासाठी आम्ही मराठा वनवास यात्रा काढली आहे. 50% च्या आतून ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. असे या वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात आयोजक योगेश केदार यांच्यासह प्रताप सिंह कांचन पाटील, सुनील नागणे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, एड रोहित देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे दिगंबर मिसाळ, बाळासाहेब वागज, संगीता गायकवाड, डॉ पांडुरंग गायकवाड, राहुल काळे ,अजय गायकवाड, वैभव नांगरे, एड मंगेश देशमुख ,विलास देशमुख, विजय देशमुख, किशोर देशमुख ,नवनाथ जाधव, अमोल जगदाळे, संतोष कोडलिंगे, एड मृणाल महाडिक ,अश्विनी पाटील, नागेश खरसडे ,पिंटू देशमुख नितीन मुळे, विजय काळे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन पाटील यांनी केले तर आभार सचिन खुळे यांनी मानले.