विहाळ येथुन चोरी करुन पळालेल्या संशयीताला गावकऱ्यांनी पाठलाग करुन पकडले
करमाळा समाचार
विहाळ – पोंधवडी रस्त्यावर विकास मारकड यांच्या घरी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली दिवसा चोरी झाली. गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान चोरी करून काही चोर पोंधवडेव मार्गे राजुरी येथे गेल्याची माहिती समजली होती. त्या संशयावरून एक जण ताब्यात घेण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. त्याला पकडून लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. करमाळा पोलीस होईल तपास करीत आहे.

संबंधित संशयिताचा पाठलाग करत असताना गाडीवरून पडून संबंधित संशयीत चोर हा सापडला व तो जखमी झालेला आहे अशी प्राथमिक माहीती मिळत आहे. त्यावेळी त्याला पोलिसांनी कडे नेण्यात आले पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन संबंधित संशयीताला उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.
