मळणी यंत्रात केस अडकुन झालेल्या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू
करमाळा समाचार
शेतात मळणी यंत्र वर काम करत असताना महिलेचे केस यंत्रात अडकून झालेल्या अपघातात 42 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना पोथरे तालुका करमाळा येथे घडल्याने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेत उषा पंडित झिंजाडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी बाराच्या सुमारास स्वत: च्या शेतात पतीसह काम करत असताना मळणी यंत्रात केस अडकून महिलेचा मृत्यू झाला आहे. सदरची महिला आपल्या पतीसोबत इतर वेळी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत होती. यामुळे गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात एवढा भयानक होता की केस अडकून महिलेचे सीर धडा वेगळे होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
