करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी .कोळसे पाटील रिटेवाडीत ; भांडवलशाही आणि ब्राम्हणवादावर निशाणा

करमाळा समाचार -संजय साखरे

या देशात रुजू होत असलेली भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि ब्राह्मणवाद हेच खरे या देशाचे शत्रू असून 2024 ला जर हेच पुन्हा या देशाचे सत्ताधीश झाले तर आम्हाला अशी वैचारिक चळवळ चालवता येणार नाही असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी .कोळसे पाटील यांनी रिटेवाडी तालुका करमाळा येथे केले .

जागतिक महिला दिन, राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व महाशिवरात्री चे औचित्य साधून रिटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने रिटेवाडी येथील ग्रामदैवत लोक देव भैरवनाथ मूर्तीची स्थापना व मंदिराचा कलश् रोहण समारंभ पारंपरिक रूढी व प्रथा परंपरांना फाटा देत थोर विचारवंत व माजी न्यायाधीश बी .जी कोळसे पाटील व सुप्रसिद्ध वक्ते आणि इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी न्यायमूर्ती कोळसे पाटील बोलत होते. यावेळी डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना कोळसे पाटील पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षानंतर ही आपल्याला सांगावे लागते की अंधश्रद्धेतून बाहेर पडा. गेल्या दहा वर्षापासून देशात मनुस्मृतीचे राज्य असून फक्त देवाच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण चालू आहे. ज्या व्यवस्थेने आपल्याला पाच हजार वर्षे पायदळी तुडवले त्याच व्यवस्थेचे आज आम्ही गुलाम झालो असून आपल्या देशात भगवे कपडे घालून देशाची लूट चालू आहे. ब्राह्मणवादी किडे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. देशाचा कारभार दैनंदिन प्रश्नावरून राम मंदिरावर चालू आहे . समाजात आपला काय दर्जा होत आहे समजण्यासाठी महिलांनी मनुस्मृती एकदा वाचावी असे आवाहन त्यांनी केले. ज्या देशांमध्ये स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही तो देश विकास करू शकत नाही म्हणून तुमचे शत्रू ओळखा. भारतीय म्हणून जगा असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले.

यावेळी व्यासपीठावर डॉक्टर श्रीमंत कोकाटे,गणेश करे पाटील, शिवाजीराव बंडगर, नितीन खटके, ऍड सविता शिंदे, सरपंच लता रिटे, सोनाली भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास कोकरे साहेब यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संजय चौधरी यांनी केले. यावेळी रिटेवाडी पंचक्रोशीतील  ग्रामस्थ  व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE