शासकीय कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात कामकाजही थांबवले ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीत रोपे लागवड करत असताना जिंती येथील शेलार कुटुंबीयांनी शासकीय कामकाजात अडथळा करीत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोमनाथ शेलार, सुखदेव शेलार, रेखा शेलार, पूजा शेलार व माऊली शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दि 10 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वनरक्षक वनमजूर व रोजंदारीवर मजूर हे काम करत असताना त्या हा प्रकार घडला.

जिंती येथे दुपारी काम करत असताना त्याठिकाणी शेलार कुटुंबीय आले व त्यांनी काम करण्यास अडथळा आणला. तसेच वनमजूर तोरमल यांना सोमनाथ शेलार यांनी चापट मारून दमदाटी केली. त्याशिवाय शेलार कुटुंबीयांनी रोपे लावण्यास अडथळा करून काम बंद पाडले. म्हणून या सर्वांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे.