पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरी ; अशी वस्तुची केली चोरी तुमचा विश्वासही बसणार नाही..
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १ केत्तुर
करमाळा तालुक्यातील केतुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरी झाले आहे. या जनावरांच्या दवाखान्यातून चक्क फ्रीज चोरीला गेला आहे. ही चोरी आज सकाळी उघडकीस आली याप्रकरणी पुढील तपास करमाळा पोलिस करत आहे.


आजपर्यंत अनेक चोर्या झाल्या आहेत. पण जनावरांच्या दवाखान्यात ही चोरी होईल अशी कोणी विचारही केला नसेल. पण करमाळ्यातील चोरांनी हे करून दाखवला आहे. आधी सरकारी कार्यालयांच्या परिसरातील थोडेफार भंगार चोरीला जात होते. हे ऐकून असाल पण आता मात्र चोरांनी हद्दच केली. या पशुवैद्यकीय दवाखान्यातील चक्क फ्रिज चोरून नेले आहे. या चोरीची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लोकांची धांदल उडाली आहे. तर लॉकडाऊन मुळे हाताला काम नसल्यामुळे अडचणीत वाढ झालेली असताना चोऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. ही चोरी केतुर परिसरातील जनावरांच्या दवाखान्यात झाली आहे. पण फ्रीज सारखी मोठी वस्तू चोरून नेण्याचा प्रताप या चोरांनी करून दाखवला असल्याने नेमकं या चोरीच्या मागचा उद्देश काय असेल हे समजण्यापलीकडे आहे. मोठी गोष्ट पळवण्यासह लपवणेही अवघड असल्याने लवकरच या गुन्ह्याचा तपास करमाळा पोलिस लावतील यात शंकाच नाही. पण आता घरातील व ऑफिस मधील वस्तूही लॉकरच्या आत मध्ये ठेवाव्यात का असा प्रश्न निर्माण झाला आहे.