मुलाच्या मृत्यु नंतर उधारी फेडण्यासाठी आणलेली रक्कम चोरी ; पोलिसांनी तपास करुन केली परत
करमाळा समाचार
चोरीच्या घटनेतील जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आला. यामध्ये एक महिला आपल्या मुलाच्या मृत्यूपूर्वी केलेली सोन्याची उधारी फेडण्यासाठी आल्यानंतर तिच्याजवळची रोख रक्कम ९ हजार चोरीला गेली होती. ते आज तब्बल वर्षभरानंतर तीला माघारी मिळाली अशी माहीती पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे(suryakant kokane) यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती अशी की, पोथरे ता. करमाळा येथील अलका अनंता दुरगुडे यांच्या मुलाचे अपघाती निधन मागील दोन वर्षापूर्वी झाले होते. त्याने मरण्यापूर्वी करमाळ्यातील सोने व्यापाऱ्याकडुन सोने उधारीवर सोने खरेदी केले होते. पण त्यातील नऊ हजार उधारी शिल्लक होती. मुलगा तर राहिला नाही पण त्याची उधारी फेडणे आपले कर्तव्य समजुन त्याची आई अलका दुरगुडे यांनी पैसे द्यायचे ठरवले.

११ डिसेंबर २० रोजी मुलीसह करमाळ्यातील दुकान गाठले. इथे पोहचल्यानंतर अल्पवयीन दोन मुलांसह एका महिलेने दुरगुडे यांची पर्स लांबवली. त्यात नऊ हजार रुपये व आधारकार्ड होते. आरोपीचा शोध घेऊन तपास पुर्ण केला व संबंधिताकडुन तब्बल आठ हजारांची रक्कम जप्त केली व ती आज न्यायालयाच्या आदेशाने दुरगुडे यांना माघारी देण्यात आली.
या प्रकरणात महिलेने चोरी करताना दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन चोरी केली होती हे तपासात उघड झाले आहे. वर्षभराने का होईना पैसे मिळाले यात महिलेने समाधान व्यक्त केले. पण ज्या मुलाची उधारी फेडायची होती त्याच्या आठवणीने मात्र त्या आईला आपला हुंदका आवरता आला नाही. पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणी तीचा साहेबांसमोरच संयम सुटला आणी ती रडु लागली. यावेळी साहेबांनी तीला धीर दिला. यावेळी तीनेही सर्व प्रकाराबाबत समाधान व्यक्त करीत निघुन गेली. यावेळी मुद्देमाल कारकुन चेतन गवंडी उपस्थीत होते.
Karmala police, karmala crime, suryakant_kokane