…..तर हत्तीवरून मिरवणूक : गणेश करे पाटील
करमाळा समाचार
मंगळवार दि.30 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतीराव फुले विद्यालय मोरवड ता.करमाळा या विद्यालयात गुणवंतचा सत्कार समारंभ संपन्न झाला. चंद्रपूर सैनिक स्कूल येथे निवड झालेला विद्यालयाचा विद्यार्थी चि. सोहम राजेंद्र वणवे तसेच नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झालेला विद्यार्थी चि. प्रतीक गोकुळ मोहोळकर यांच्या सत्कार समारंभ वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच या वेळी वीट केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख श्री चंद्रहास चोरमले यांचाही सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना गणेश करे पाटील म्हणाले की महात्मा जोतीराव फुले विद्यालय एक आदर्श विद्यालय आहे या ठिकाणी प्रत्येक वेळी आल्यानंतर काही तरी नाविन्यपूर्ण बाब बघायला मिळते.या विद्यालयातील विद्यार्थी ही गुणवंत,कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणारे व आपल्या यशाची चमक दाखवणारे आहेत.
यापुढे बोलताना त्यांनी तालुक्यातील मुलांसाठी एक अभिवचन दिले,तालुक्यातील कोणत्याही गावातील तरुण MPSC उत्तीर्ण झाला तर त्याची मिरवणूक यशकल्यानी भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतूळा इथपर्यंत घोडयावरून वाजत गाजत काढली जाईल.तसेच जर कोण तरुण UPSC उत्तीर्ण झाला तर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल असेही मत व्यक्त केले.
*कानगडे कुटुंबावर दुखा:चा डोंगर ; कर्जत तालुका शोकसागरात*
https://karmalasamachar.com/a-mountain-of-grief-over-the-kangade-family-karjat-taluka-in-mourning/

यावेळी अवधूत विद्यालय वांगीचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र वणवे ,वीट केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख श्री चंद्रहास चोरमले,चि. सोहम वणवे,चि.प्रतीक मोहोळकर यांचीही भाषणे झाली.या कार्यक्रमासाठी श्री बाजीराव वणवे,सौ मनीषा वणवे,माझी ग्राम पंचायत सदस्य सौ मंगल मोहोळकर, श्री खांबेवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री आप्पासाहेब वाघमोडे ,तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश गायकवाड सर यांनी केले,प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ मोहोळकर सर यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब बनगर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.