वर्षभरापासुन टेंडर घेतलेय कामच नाही ; ठेकेदारावर कोण मेहरबान ?
करमाळा समाचार
करमाळा गुळसडी मार्गावर पांड ओढा येथे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याच्या तक्रारी गेल्यानंतर तात्पुरतं समाधान करण्यासाठी त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगून पाईप आणून टाकण्यात आले. परंतु तब्बल एक महिना उलटला तरी अद्याप त्या ठिकाणी कोणतेही काम झालेले नसल्याचे दिसून आले नाही. नुसतेच लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याची काम या ठिकाणी केले जात असल्याचे दिसून येत आहे. अशा ठेकेदारावर कोण मेहरबान आहे ?

करमाळा गुळसडी मार्गावर पांड ओढा येथे पूल पूर्ण खचला असून त्यावरून थोड्या पावसातही पाणी वाहून जाते. या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी एक व्यक्ती वाहून गेला होता. तर करमाळा तालुक्यात सुरुवातीच्या पावसामध्ये पहिल्याच पावसात पुन्हा एकदा ओढ्यावरून पाणी वाहू लागले होते. तो विषय चर्चेत आला व सर्वांनीच बांधकाम विभागाला धारेवर धरले. यावेळी तात्काळ घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असल्याचे दाखवत बांधकाम विभागाचे अभियंता श्री उबाळे यांनी संबंधित ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना दिल्या. परंतु लोकांचा रोष कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी पाईप आणून टाकले. परंतु पुन्हा त्या ठिकाणी कसलेही काम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुसतेच लोकांच्या भावनांशी खेळले जात असल्याचे दिसून येत आहे.

सदरचा रस्ता हा शेलगाव, सौदे, सरपडोह, वरकटणे, भालवडी, निंभोरे, केम या गावाला जाणारा आहे. मागील दोन वर्षांपूर्वी एका परप्रांतीय व्यक्तीचा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहुन गेला नंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सदर रस्त्याचे टेंडर काढण्यात आले. पण अद्यापही पुलाचे काम अर्धवटच असल्याने सध्या आणून टाकलेल्या पाईप व खडीमुळे उलट वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रस्त्याची रुंदी कमी झाली असून उंची ही कमीच आहे. यामुळे पुन्हा मोठा पाऊस झाल्यास धोका संभावतो.
संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत मागील वेळी सूचना दिल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली होती परंतु अद्याप काम सुरू झाले नसले तरी येत्या दोन दिवसात तो काम सुरू करेल याबाबत त्याला कळवले आहे.
– कुंडलीक उबाळे, अभियंता, बांधकाम विभाग करमाळा.