करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लोक अंगणात तसेच टेरेस वर झोपल्यानंतर चोऱ्या ; ड्रोनवरचा संशय वाढला चार लाखांची चोरी

करमाळा समाचार 

तालुक्यातील सावडी व साडे येथे वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्यानंतर संबंधित ठिकाणाहून एकूण तीन लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही चोरी वेगवेगळ्या भागात तालुक्याच्या पूर्व- पश्चिम दिशेला जरी असल्या तरी एकाच दिवशी झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ड्रोन सारख्या उपकरणांचा वापर करून चोरी तर केली नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

शिक्षक दिनेश पोपट शेलार रा. साडे दि.01 रोजी रात्री 10.30 वा चे सुमारास जेवण करुन कुटुंबीयांसह घराचे स्लॅपवर झोपले होते. तर इतर घराच्या पोर्च मध्ये होते. दि.02/10/2024 रोजी पहाटे 05.30 वा चे सुमारास माझे आई वडीलांनी दिनेश यांना खाली बोलावून आपले घरामध्ये चोरी झाली आहे असे सांगितले यावेळी सदरचा दरवाजाचा उंबरा उचकटून दरवाजा उघडल्याचे दिसल्याने घरामध्ये जावून पाहणी करता घरामधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले बेडरूममधील कपाटाची पाहणी करता लॉकरमधील वडीलांना ऊसतोड मजुरांना देण्याकरीता आणलेले तिन लाख रु रोख रक्कम व पत्नीचा एक तोळयाचा सोन्याचा मिनी गंठन ठेवलेल्या ठिकाणी मिळून आला नाही.

politics

येथुन 3,00,000/- रुपये रोख रक्कम व 40,000/- रु किंमतीचा एक तोळयाचा सोन्याचा मिनी गंठन चोरीस गेला आहे.

तर सावडी येथे दोन ठिकाणी चोरी झाली आहे. गोवर्धन विट्टल चिंदे वय 45 वर्षे धंदा शेती, रा. सावडी ता. करमाळा हे दि. 01 रोजी रात्री 11/00 वा. चे सुमारास घराचे बाहेर अंगनात झोपले होते. झोपते वेळी त्यांनी मोबाईल फोन उशीजवळ ठेवला होता. तसेच खिशामध्ये पैसे असलेली पॅन्ट ही जवळच काढुन ठेवली होती. त्यांच्या पत्नी अर्चना हीने तिचे कानातील फुले टोचत असल्याने तिने तिचे उशीला काढुन ठेवली होती. पहाटे 03/00 वा.चे सुमारास त्यांना जाग आल्याने मोबाईल शोधला असता मोबाईल मिळाला नाही. तेव्हा घरचे लोकांना उठवुन पाहणी करता मोबाईल तसेच पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम व पत्नीचे कानातील फुले ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आली नाही. यांच्या प्रमाणेच घराचे शेजारी राहणा-या मालन विट्टल रोमन यांचे येथे ही घराचे बाहेर झोपले नंतर चोरी झाले बाबत माहीती मिळाली आहे.

याठिकाणी 12000/- रूपये किंमतीची 3 ग्राम वजनाची कानातील सोन्याची फुले, 8000/- रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एफ 15 मॉडेलचा मोबाईल, 8500/- रूपये रोख रक्कम असे एकुण 28,500/- रूपये चोरीस गेले आहेत.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE