मराठा आरक्षणाचा तिसरा टप्पा ; जरांगे पाटीलांची तोफ करमाळ्यात धडाडणार
करमाळा समाचार
मराठा आरक्षणासाठी लवकरच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांचा पुढील दौरा सुरु होणार आहे. याबाबतची माहीती स्वतः जरांगे पाटलांनी दिली आहे. यामध्ये सुरुवातीलाच सोलापूर जिल्ह्यात करमाळ्यापासुन सुरुवात करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तर याबाबत करमाळा तालुक्यात वांगी क्र १ येथे नियोजन करण्यात आले आहे.

जरांगे पाटलांनी सुरवातीला केलेल्या दौऱ्यामुळे मराठा समाज एकजुट झाल्याचे दिसुन आले होते. आता पुन्हा पुढच्या आंदोलनासाठी जरांगे तयारी करीत आहेत. पुढच्या लढाईत सहभागी होण्यासाठी ते करमाळ्यातही येत आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाची उत्सुकता सर्वाना आहे. कधी नव्हे तो करमाळा तालुका एकजुट झाला आहे. तालुका पातळीवर करमाळ्याची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यालाही मोठ्याप्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

15 नोव्हेंबर 2023 पासून ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण पहिले दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर आता तिसरा टप्पा सुरु करत आहोत अशी घोषण मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील 15 नोव्हेंबर रोजी वाशी, परंडा, करमाळा तर 16 नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी, 17 नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड यासह संपुर्ण दौरा जरांगे पाटलांनी जाहीर केला आहे.
दि.१५ नोव्हेंबर मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या कुशीत वसलेल्या *ऐतिहासिक वांगी नगरीत भव्य १७१ एकर* मैदानात गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण लढाईतून होणार
ठिकाण: मराठा आरक्षण मैदान वांगी नं१
जयस्तु मराठा