करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुख:द – रमेश वीर यांचे निधन ; करमाळा शहरात शोककळा

करमाळा समाचार

करमाळा शहरातील शहाजी उर्फ रमेश विश्वनाथ वीर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. करमाळा येथे अचानक त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोकळा पसरली आहे.

रमेश वीर हे युवकांच्या सानिध्यात असलेले नेतृत्व असून कचेरी परिसरात बॉन्डरायटर संघटना तसेच महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून ते काम पाहत होते. जेष्ठ विधीज्ञ कमलाकर वीर यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा व बंधू व इतर परिवार आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE