करमाळा व माढा तालुकातील तलाठ्यांच्या बदल्या ; एकुण १९ तलाठ्यांच्या बदल्या
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील तलाठी पदावरील बदल्या झाल्या असून नुकतेच त्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातून माढा तालुक्यात सात तलाठी गेले आहेत. तर माढा तालुक्यातील आठ तलाठी करमाळा तालुक्यातील नव्याने आले आहेत. तर चार तलाठ्यांच्या तालुक्यातच दुसरा सज्जा मिळाला आहे असे एकूण 19 तलाठ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत.

करमाळ्यातून बाहेरगावी गेलेले तलाठी
वाय बी पवार – सालसे येथून अंबड
जी डी कुलकर्णी – पांगरे येथून म्हैसगाव
पी बी चव्हाण – केम येथुन कुर्डु
यु जे बनसोडे – कंदर येथून तुळशी
एम वाय हेड्डे – वांगी येथून मोडलिंब
श्रीमती एम बी आंधळे – झरे येथून रोपळे
ए आर चव्हाण – मांजरगाव येथून बेंबळे

बाहेरून करमाळा तालुक्यात आलेले तलाठी व गाव
सी के नावडे- वांगी क्रमांक एक
के जी दळवे – सावडी
जी वाय ढोकणे – कंदर
व्ही आय आखाडे- कामुणे
एस एस कांबळे- पांगरे
आर बी आदलिंगे – केम
डीसी बोराडे – चिखलठाण
श्रीमती एस एस बनसोडे – मांजरगाव
फक्त सज्जा बदललेले तलाठी
ए जे डोणे – चिखलठाण ते पोपळज
एस व्ही शेटे – जिंती ते रामवाडी
व्हीआय कसबे – आळजापूर ते झरे
पी एच माने- केतुर ते जिंती