करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गोमांस प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल ; तब्बल ‘इतके’ किलो गोमांस ताब्यात

करमाळा समाचार

आज सकाळी गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीला पकडण्यात आले तेव्हा संबंधित चालक उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु ज्यावेळी पोलिसांनी आपला खाक्या दाखवला त्यावेळी चालक व सोबत असलेल्या व्यक्तीने सर्व माहिती बोलून दाखवली आहे. सदरच्या प्रकरणात परांडाहून पुण्याच्या दिशेने संबंधित गोमास घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्यात एका व्यक्तीने त्यांना पकडल्याने सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.

एम एच 12 व्ही एफ 15 31 या गाडीतून जवळपास 1880 किलो वजनाचे जनावरांचे मास घेऊन सदरची गाडी पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी कात्रज येथील राजू शिंदे यांनी संबंधित गाडी अडवली व त्यात पाहणी केली असता त्यामध्ये लालसर रंगाचे जनावरांचे मांस आढळून आले. यावेळी त्यांनी सदर गाडी ताब्यात घेऊन करमाळा पोलिसांना कळवले.

तात्काळ पोलीस घटनास्थळावर पोहोचले. यावेळी गोमांसासह दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये हुसेन खान व 28 व रेहान खान व 24 राहणार रविवार पेठ पुणे यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE