आरोग्य तपासणीसह वृक्ष वाटप ; सोगाव ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
करमाळा समाचार
आज दिनांक 28 रोजी माझे मुल माझी जबाबदारी या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सोगाव येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी सोगाव ग्रामपंचायत तर्फे आंबा व सीताफळ या झाडांची रोपे भेट देण्यात आली.

याप्रसंगी डॉक्टर विठ्ठल हजारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली साके यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल.

यावेळी सरपंच पुष्पलता गोडगे, भगवान बरडे, गणेश गोडगे, उमेश गोडगे, मनोज घनवट, स्वप्निल गोडगे, तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.