करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ; येथील अधिकाऱ्याच्या कामावर खुश होऊन होतेय रस्त्याला नाव देण्याची मागणी

सुनिल भोसले – करमाळा समाचार 

तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीतील सेंट व्हीला नाका ते जुना डम्पिंग ग्राउंड कडे जाणाऱ्या रस्त्याला तत्कालीन मुख्याधिकारी मुळचे रिटेवाडी ता. करमाळा येथील रामदास तुकाराम कोकरे यांच्या नावाने नामकरण करावे अशी मागणी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे नगरसेवक संदिप कदम यांनी केली आहे. हा बहुमान मिळण्यामागे त्यांच्या कामावर टाकलेला दृष्टीक्षेप थोडक्यात मांडत आहोत. ते सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उप आयुक्त म्हणुन काम पाहत आहेत.

माथेरान गिरिस्थान नगर परिषदेमध्ये कोकरे यांनी २३ जुलै २०१८ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत कार्यरत होते. त्यांनी चांगल्या प्रकारे काम करत ओला सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त माथेरान, डम्पिंग मुक्त माथेरान इत्यादी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोकरे यांनी माथेरान नगरपरिषद रुजू होण्याआधी तेथील कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया योग्य प्रकारे होत नव्हती. परंतु कोकरे यांच्या माथेरान नगरपरिषद कडे लक्ष केंद्रित केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी ही हजेरी लावत डम्पिंग मुक्त माथेरान ही संकल्पना प्रत्यक्षात साकार केली.

सद्यस्थितीत माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीतील सुमारे तीन मेट्रिक टन कचरा निर्मिती होते. त्यापैकी दोन मेट्रीक टन ओला कचरा व एक टन सुका कचरा आहे. संपूर्ण ओला कचरा माथेरान निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पात १०० टक्के प्रक्रिया केला जातो. कोकरे यांनी डम्पिंगला जाणारा कचरा बंद केला व पूर्वीचा संपुर्ण २००२ पासून डम्पिंग ग्राउंड येथे असलेल्या कचरा बायोमायनी प्रक्रिये निर्गत केला. अशाप्रकारे कोकरे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यामुळे प्रोत्साहनात्मक बाब म्हणून सेट व्हिला ते जुन्या डम्पिंग ग्राउंड कडे जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नाव द्यावे अशी विनंती माथेरान गिरिस्थानच्या नगराध्यक्षा यांच्याकडे कदम यांनी निवेदनातून करण्यात आली आहे.

कोकरे यांची कारकीर्द…
कोकरे हे २००६ ते २०१० पर्यत पोलिस उपनिरिक्षकपदी रुजु झाले त्यावेळी वादमुक्त गाव केल्यामुळे महात्मा गांधी जागरुक पुरस्कार दिला गेला. त्यानंतर त्यांनी २०१० ते २०१२ पर्यत दापोली नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी म्हणुन काम करताना प्लॅस्टीक मुक्त दापोली, बायोगॅस पासुन वीज निर्मीती, सोलर – वायु वीज निर्मीती, हरित शहर व कचरामुक्त शहर प्रकल्प राबवले त्यावेळी त्यांना कोकण विभाग संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व वसुंदरा २०१२ पारितोषिकने सन्मानीत करण्यात आले. २०१२ ते २०१५ याकालावधीत औसा व केज येथे मुख्याधिकारी म्हणुन प्लॅस्टीक मुक्त व भटक्या जनावरांवर नियत्रण मिळवले तर २०१५ ते २०१७ मध्ये मुख्याधिकारी म्हणुन वेंगुर्ला येथे टाकाऊ पासुन तेल व प्लॅस्टीक पासुन रस्ता प्रकल्प राबवत प्लॅस्टीक मुक्त शहर तयार केले. त्यावेळी उघड्यावर शौचमुक्त गाव केल्यामुळे सन्मानीत करण्यात आले. शिवाय सिंधुदुर्ग भुषण सह अनेक पारितोषिक कोकरे यांना मिळाली आहेत.
चौकट पुर्ण

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE