करमाळासोलापूर जिल्हा

वर्गणीच्या मोबदल्यात अनोखा उपक्रम ; नवयुग मित्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांचा संकल्प

प्रतिनिधी -संजय साखरे


रिटेवाडी ता करमाळा येथील “नवयुग मित्र मंडळाने “आज श्री गणेश चतुर्थी निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.जमा झालेल्या लोकवर्गणीतून फळझाडांची रोपे खरेदी करुन गावातील सर्व घरासमोर वृक्षारोपण करायचा संकल्प केला आहे.

श्री गणेश चतुर्थी पासुन ते अनंत चतुर्दशी पर्यंत गावात वृक्षारोपण करायचे, तसेच करोना बद्दल लोक जागृती करायची अशी मंडळातील सर्व सदस्यांनी प्रतिज्ञा केली की आज पासून वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातुन वृक्षारोपण करायचे.

विशेष म्हणजे या मंडळातील सर्व सभासद हे आठरा वर्षाच्या आतील आहेत, या मंडळाला मार्गदर्शन आशा सेविका सौ.ताई पवार & ग्रामपंचायत सदस्या सौ.लता देवकते यांनी केले. आज श्री गणेश चतुर्थी दिवशी वृक्षारोपणाला सुरूवात रिटेवाडीचे पोलिस पाटील अ‍ॅड.राजेंद्र पवार यांच्या घरासमोर वृक्षारोपण करून केले तर अनंत चतुर्दशी दिवशी सरपंच दादासाहेब कोकरे यांच्या घरासमोर वृक्षारोपण करुन सांगता करण्यात येणार आहे.

ads

नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश देवकते, सदस्य ऋतुराज पवार , प्रथमेश ढवळे, रोहन पवार, काळुराम देवकते, रोहित पवार, समाधान पवार, विकास पवार, समर्थ पवार, प्रदीप कांबळे, सुजित कांबळे, रोहन ढवळे, आदर्श ढवळे, सोहम पवार, सार्थक ढवळे, रविराज ढवळे, शुभम कांबळे, राज ढवळे , यशराज खरात, पृथ्वीराज पवार , अविनाश खटके, गणेश खटके , समाधान खटके यांचा सहभाग आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE