विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंड करण्यापेक्षा अनोखी शक्कल ; बाधीत शोधण्यास होतेय मदत
करमाळा समाचार
करमाळ्यातील विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक रहावा म्हणुन आरोग्य विभाग, नगरपरिषद व पोलिसांच्या सयुक्त कामगीरी करत असताना अनोखी शक्कल लढवली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपीड ॲंज्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. यामुळे पहिल्याच दिवशी अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लोक रस्त्यावर विनाकारण कमी फिरु लागले .

तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असताना लोकांना विनवण्या, दंड केला तरी लोक ऐकत नव्हते. अखेर यंत्रणेने अनोखी शक्कल लढवली आहे. तीन वेगवेगळ्या पथकात वेगवेगळ्या वेळेनुसार तीन गट पाडण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून आरोग्य विभाग, पोलिस व नगरपरिषद कर्मचारी काम करत आहेत.
आज पहिल्याच दिवशी सकाळच्या वेळेत जवळपास दोनशे जणांची टेस्ट करण्यात आली आहे. आता पर्यत पंधरा पेक्षा जास्त बाधीत यामध्ये मिळुन आले आहेत. अशीच कारवाई करीत राहिल्यास अनेक रुग्ण मिळुन येतील .

तसेच हीच कारवाई दवाखान्या बाहेर केल्यास रुग्णांचे नातेवाईक जे विनाकारण दुसऱीकडे फिरुन रोग पसरवत आहेत. ते ही बाधीत मिळाल्यास रोग पसरणार नाही. त्यामुळे कोविड हॉस्पिटल शिवाय इतर मोठ्या दवाखान्यांच्या बाहेर ही टेस्टींग करायला हवी.