करमाळ्यातील क्रिकेट स्पर्धेतील चषकाचे आ. निलेश लंकेच्या हस्ते अनावरण ; लंकेंनी दिले आश्वासन
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील वीट येथे आमदार निलेश लंके मित्र परिवार व शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आमदार निलेश लंके यांचे क्रिकेट मैदानावर स्वागत करण्यात आले. यावेळी निलेश लंके यांच्या हस्ते टॉफ्रीचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना लंके म्हणाले भविष्यात सामने आयोजनासाठी भविष्यात आपण ५१ हजार देणगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले अशा स्पर्धातुन ग्रामीण भागातुन चांगले खेळाडू घडतात याचा खुप आनंद आहे, या स्पर्धसाठी प्रथम पारीतोषीक गणेश चिवटे (भाजप ) अध्यक्ष करमाळा तालुका यांनी २१ हजार, द्वितीय पारीतोषीक १५०००हजार प्रशांत पाटील सरपंच झरे, तृतीय पारीतोषीक अभय सिंह भोसले ७७७७ हे दिले होते. स्पर्धा चषक सौजन्य गणेश करे पाटील यांनी दिले होते.

सदर स्पर्धा गणेश चिवटे मित्र परीवार, आमदार निलेश लंके मित्र परीवार, शंभुराजे प्रतीष्ठान,दादाश्री फांऊडेशन वीट यांच्या वतीने आयोजीत करण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे, जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र सिंह राजेभोसले वीट चे माजी सरपंच अभयसिंह राजे भोसले राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे पाटील, व विविध गावचे सरपंच व निलेश लंके मित्रपरिवार यांचे कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन दादाश्री फाउंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब काकडे यांनी केले होते.
ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैभव राऊत,पांडूरंग खैरे, आकाश ढेरे, अदित्य गाडे,शिवतेज गाडे, बन्या खंडागळे, केशव खंडागळे,बालाजी निंबाळकर, अमोल जाधव, गोवींद भोसले, गणेश ढेरे, विजय धाकतोडे, माऊली जाधव, किरण आवटे यांनी परिश्रम घेतले.