करमाळासोलापूर जिल्हा

विषारी औषध घेतलेल्या विवाहीत महिलेला कोरोना रुग्ण म्हणुन उरकला अंत्यविधी

करमाळा समाचार 

माधुरी अनिल वाठोरे वय 26 वर्षे रा. गणेशनगर करमाळा ता.करमाळा जि. सोलापूर हिचे अमोल सदाशिव शिंदे रा.देवळाली ता.करमाळा याचे सोबत सुमारे 04 वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही बाब मयताचे पती अनिल व अमोल शिंदे यांचे पत्नीस माहिती झाल्याने माधुरी हिस तिचे पती अनिल याने नांदावण्याचे सोडून दिले होते. तर ज्यावेळी तीने विषारी औषध घेऊन मयत झाली तीला त्यावेळी कोरोना रुग्ण असल्याचे सांगुन अंत्यविधी उरकला त्यामुळे सदर पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल शिंदे याने मयतास पुणे,यवत या ठिकाणी खोली भाडयाने घेवून ठेवले होते. त्यानंतर सुमारे एक वर्षापासून फुलारी मळा, गणेश नगर, करमाळा येथे मयतास व तिची मुलगी वय 07 वर्षे हिला भाडयाने घर घेवून ठेवले होते. त्यानंतर मयतास तिच्या मागणीप्रमाणे हक्काचे घर घेवून दिले नाही, दुसरे अपत्याचे तिने अपेक्षा करून ही तिला बाळ होवू दिले नाही, कानातील सोन्याची रिंग घेवून दिले नाहीत, तिला पत्नी सारखा वेळ दिला नाही उलट तिने मागणी केल्यानंतर शिवीगाळ करून दमदाटी करत तुला आता माझेशिवाय कोणीही नाही, तुला माझे सोबतच राहायचे आहे अशी भाषा वेळोवेळी वापरून तिला दिनांक 24/05/2021 व दिनांक 25/05/2021 रोजी 17/30 वा पर्यत जास्तीचा मानसिक व शारिरीक छळ केला म्हणून मयताने राहते घरातील बाथरूममध्ये जावून फिनेल सारखे कांही तरी विषारी औषध प्राशन करून बेशुध्द झाली.

politics

तिस अमोल शिंदे याने उपचारासाठी दवाखान्यात नेले तेथे डॉ. जवळेकर करमाळा यांनी तपासून मयत घोषित केले व सरकारी दवाखान्यात घेवून जाणेचे समज देवूनही डक्टरांना व पोलीसांना माहिती न देता मयत हिला कोरोना झाला आहे अशी परस्पर बतावणी करून करमाळा नगरपरिषदचे कर्मचारी बारा बंगल्याजवळील स्मशानभूमी येथे घेवून जावून दहन करून अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE