करमाळामहिलांविषयकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पंचमी निमित्ताने चव्हाण महाविद्यालयात महिलांच्या विविध स्पर्धा कार्यक्रम

करमाळा समाचार –

येथील विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयात नागपंचमी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात पारंपारिक खेळाचे व मेंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांनी मेंदी रेखाटनाचे निरीक्षण केले.

यावेळी कॅप्टन संभाजी किर्दाक यांनी मार्गदर्शन करताना मेंदी एक व्यावसायिक कला आहे. अशा कलांच्या माध्यमातून मुलींना स्वतःचे करिअर घडवता येते. तसेच भविष्यात अशा कलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. प्रा. लक्ष्मण राख यांनी आपल्या मनोगतातून मुलींना कलेविषयी प्रोत्साहन दिले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.पल्लवी टोणपे, प्रा.रूपाली शिंदे व श्री. निलेश भुसारे यांनी केले.

politics

या स्पर्धेत 1)कुमारी अनुजा कुंभार- प्रथम क्रमांक
2) कुमारी नीलम भोसले -द्वितीय क्रमांक
3) कुमारी आरसीना बागवान -तृतीय क्रमांक तर 4) कुमारी आफ्रीन मुजावर हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला .

तसेच पारंपरिक खेळाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.मीना किर्दाक तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रा.सौ. संध्या बिले या होत्या . तसेच कार्यालयीन अधीक्षक सौ.संगीता नाईक याही उपस्थित होत्या. यावेळी मेंदी स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी सौ. मीना किर्दाक यांनी बोलताना नामशेष होत चाललेल्या पारंपरिक खेळाचे आयोजन एवढ्या मोठ्या उत्साहात करण्यात आले.

हा महाविद्यालयाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तसेच या पारंपरिक खेळामुळे अनेक शारीरिक हालचाली होतात. ज्या आपल्या स्त्रियांसाठी अतिशय आवश्यक आहेत असे सांगितले. तसेच सौ. संध्या बिले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मुलींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे व सकस आहार घेतला पाहिजे असे सांगितले. या पारंपरिक खेळामध्ये फेरावरची गाणी , झिम्मा , झोका, पिंगा , वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या , काटवटखाना अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळामध्ये 400 पेक्षा जास्त मुली सहभागी झाल्या होत्या.

यामुळे महाविद्यालयातील वातावरण अतिशय आनंदी , उत्साहाचे झाले होते. यावेळी सर्व मुली वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा व साजशृंगाराने नटलेल्या होत्या. सर्वत्र चैतन्याचे उधाण आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सौ.सुजाता भोरे, प्रा. सौ. सुरेखा जाधव, प्रा.सौ. मुक्ता काटवटे , प्रा.सौ.निता माने , प्रा. सौ. सुवर्णा कांबळे, प्रा. सौ.अनिता अधोरे, प्रा. सौ. अडसूळ , प्रा. सौ.त्रिवेणी मोरे व सौ.अनिता साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE