आप्पासाहेब झाझुर्णै यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
–प्रतिनिधी सुनिल भोसले
मकाई कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब झांझुणे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालयात येथे फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . दरवर्षी वाढदिवसासाठी अनेक कार्यकर्ते आप्पांवर निष्ठा असणारे शुभेच्छा देण्यासाठी घराकडे येत असतात. व विविध कार्यक्रम राबवत असतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आप्पांनी सर्वच कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. अशा सुचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा येथील उपजिल्हा रूग्णालायातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती करमाळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष शिवराज जगताप, गौरव झांझुणे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख, शहर खजिनदार अरुण टांगडे, राजू सय्यद, मेजर कांबळे, शहर ओ बी सी अध्यक्ष ओंकार पलंगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.