हिसरे येथील ग्राम दैवत मरीआई यात्रेस दिनांक सात जुलै शुक्रवारपासून प्रारंभ
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील हिसरे येथील ग्रामदैवत मरीआई उर्फ लक्ष्मी माता यांची मुख्य यात्रा सात जुलै शुक्रवारी रोजी भरणार असल्याची माहिती हिसरे येथील यात्रा कमिटीने दिली. प्रति वर्ष प्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत लक्ष्मी आई यांच्या यात्रेनिमित्त हिसरे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असून दिनांक सात जुलै रोजी दुपारी तीन वाजता गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते सदर यात्रेसाठी पुणे मुंबई परिसरातील अनेक भक्तगण या यात्रेला हजेरी लावतात.

याशिवाय दिनांक आठ जुलै शनिवारी रोजी सकाळी नऊ वाजता हजेरीचा कार्यक्रम तसेच कुस्त्याचा भव्य आखाडा दुपारी दोन ते सात वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे. सदर कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन अमित जगदाळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन ज्ञानेश्वर पवार यांची मुख्य कुस्ती भरण्यात येणार आहे. याप्रमाणे छोटे-मोठे शंभर कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.

सदर यात्रेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी तसेच समस्त हिसरे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.