अर्जुननगर म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायतला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामाबाबत आढावा
करमाळा समाचार सुनिल भोसले
दिनांक 17- 2- 2019 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अनिरुद्ध कांबळे यांनी अर्जुननगर म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायतला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामाबाबत आढावा घेऊन कांबळे यांनी कामाची माहिती जाणून घेतली. जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन पाहणी केली व विविध सूचना दिल्या.

अर्जुननगर ग्रामपंचायतीच्या वतीने मा.अध्यक्ष साहेब यांचा सत्कार अर्जुननगर चे माजी सरपंच श्री. अनिल (दादा) थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.त्याच बरोबर केम चे सरपंच श्री. अजित (दादा) तळेकर यांचा सत्कार गुरुकुल स्कूल चे अध्यक्ष श्री. नितीन भोगे (सर) यांच्या हस्ते संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना मा.अध्यक्ष यांनी अर्जुननगर गावाचा विकास हा लोकांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही असे मत व्यक्त केले.
केम चे सरपंच अजित (दादा) तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तुम्ही विविध कामाचे प्रस्ताव द्या आम्ही अध्यक्ष कडून प्रस्ताव मंजूर करून घेऊन तसेच गावाचा विकास करण्यास कटिबंध राहू गावातील राजकारण करताना जातीपातीचे राजकारण न करता सर्व समावेशक राजकारण करण्याचा सल्ला नूतन सरपंच व सदस्य यांना दिला.

या कार्यक्रमात सरपंच प्रतिनिधी श्री. प्रकाश थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भाऊसाहेब आडसुळ यांनी केले तर आभार प्रदर्शन गावचे ग्रामसेवक श्री. मनोज लटके यांनी मानले सदर कार्यक्रमास माजी सरपंच सुनील लोखंडे, दीपक ननवरे, उपसरपंच अभिमन्यू धुमाळ व इतर मान्यवर ग्रामस्थ हजर होते.