करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चिवटेंच्या गैरहजेरीत आदिनाथची बैठक ; कारखाना गाळप बंद करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ?

करमाळा समाचार

मागील वेळेपेक्षा यंदा आम्ही कारखाना चांगल्या पद्धतीने कमी खर्चात चालण्याचा प्रयत्न केला असला तरी वाहतूक व इतर कारणांमुळे यंदा कारखाना बंद करावा लागत आहे. यासंदर्भात सावंत यांच्याशी ही चर्चा झाली आहे व त्यातून सदरचा मार्ग पुढे येत असल्याचे कारखान्याचे प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी सांगितले. तर कारखाना चालवण्यासाठी सावंत यांनी वाहतूक देण्याचे मान्य केले होते परंतु न दिल्याने सदरची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे आता सल्लागार मंडळाच्या सुचनेने निवडणुकीलाही सामोरे जाण्याची तयारी असल्याचे गुटाळ यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना गुटाळ म्हणाले, ज्या व्यक्तीने कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळून दिले, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवूनच आम्ही कारखाना सुरू केला होता. त्यांनी आम्हाला वाहतूक यंत्रणा देण्याचे मान्य केले होते परंतु ऐनवेळी वाहतूक यंत्रणा न मिळाल्याने अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच जणांचं म्हणणे आले की लेखी घेणे आवश्यक होते. परंतु ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही त्यांच्यावर अविश्वास कसा दाखवणार ? आम्ही त्यांच्यावर खापर फोडत नसून त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं. पण सध्या वाहतूक यंत्रणा नसल्यामुळे कारखाना अडचणीत सापडला हे मान्य करावेच लागेल.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आज तातडीची बैठक बोलण्यात आली होती. कारखाना व्यवस्थित चालू न शकल्याने यंदा गाळप बंद करून कारखान्यावर निवडणुका घ्यायच्या की प्रशासकाकडे ठेवायचा यावर आज चर्चा होणार होती. यावेळी प्रशासकीय अधिकारी सदर बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. तर प्रशासकीय संचालकापैकीही फक्त संजय गुटाळ हेच उपस्थित राहिले. त्यामुळे महेश चिवटे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

हरिदास डांगे, अच्युत तळेकर आणि वसंत पुंडे यांनी सल्लागार म्हणुन नको म्हणाले आहेत. तर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कागारांची बैठक घेऊन असा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहीती प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी दिली आहे. यावेळी स्वाभीमानीचे रवि गोडगे, सुदर्शन शेळके, हरिभाऊ मंगवडे कारखान्याचे कामगार व सभासद मोठ्यासंखेने उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE