मोठे आंदोलन उभारण्याचा राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन इशारा ; इंधन दरवाढीवरुन केंद्रावर निशाना
करमाळा प्रतिनिधी
आज करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती वरून केंद्र सरकारच्या विरोधात तहसीलदार समीर माने व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना निवेदन दिले.

केंद्रातील भाजपा सरकारने जर लवकरात लवकर या सगळ्यांचे दर कमी नाही केले तर मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.