करमाळासोलापूर जिल्हा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनन्यसाधारण – मा.आ.नारायण आबा पाटील

करमाळा समाचार -संजय साखरे


स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढ्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांचे तर्फे आज करमाळा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्यातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

दीपप्रज्वलन माजी सैनिक श्री हनुमंत जगताप व प्रतिमापूजन करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना नारायण आबा पाटील म्हणाले की, सावरकर हे थोर राष्ट्रभक्त, प्रखर विज्ञानवादी बुद्धिवंत होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन राष्ट्रनिष्ठेशी कोणतीही तडजोड केली नाही, अत्यंत धैर्याने विपरीत परिस्थितीत ब्रिटिशांशी त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यांचा आदर्श ठेवून देव देश आणि धर्मासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी जागृत आणि गरजेचे आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच गोशाळेत जाऊन गाईंना चारा वाटप करण्यात आला .या कार्यक्रमास बाळासाहेब होशींग, राजेंद्र सूर्यपुजारी ,पत्रकार दिनेश मडके आबासाहेब टापरे ,शिवाजी जाधव, गणेश जाधव, मृदुंगाचार्य किशोर जाधव, राजेंद्र भोसले, मेजर हनुमान जगताप, मनोज कुलकर्णी, दर्शन कुलकर्णी, नरेंद्र ठाकूर, श्याम शिंधी, अमर साळुंखे, शुभम कुलकर्णी, पंकज अंदुरे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE