लालपरी जिल्ह्यासह इतर भागात धावणार ; वेळा जाहीर केल्याने प्रवाशात समाधान
करमाळा समाचार
बंद पडलेली लाल परी आज पासुन गाड्यांच्या वेळा घेऊन समोर आली आहे. आता नव्या वेळात ही गाडी धावणार असुन यासंदर्भातील वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत.

लाँकडाऊनच्या कालावधी नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंळ,करमाळा आगार येथुन उद्या आज पासुन बस सेवा सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये करमाळा पुणे सकाळी 7 ला, 9 ला, साडे दहाला, दुपारी बारा व दुपारी वाजता निघणार आहेत.
तसेच करमाळा लातुर सकाळी नऊ वाजता. करमाळा बार्शी सकाळी आठ व साडे दहाला. करमाळा कर्जत सकाळी सात व दुपारी दोन व पाच वाजता सुटेल. करमाळा -अक्कलकोट सकाळी सव्वा आठ वाजता. करमाळा सोलापूर सकाळी नऊ वाजता. करमाळा पंढरपुर सकाळी आठ व दुपारी साडे बारा निघणार आहेत.
