राष्ट्रमाता जिजाऊ प्राथमिक शिक्षक सह. पतसंसस्थेच्या चेअरमन पदी “मा.श्री.दयानंद चौधरी ” यांची बिनविरोध निवड
करमाळा समाचार
राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होवून संचालक मंडळामध्ये सविता करंडे (व्हॉईस चेअरमन) उमेश कानडे,सखाराम राऊत, अजिनाथ तोरमल, चंद्रहास चोरमले, सयाजीराजे ओंभासे, सोमनाथ शिंदे, अशोकदुधे, विजयालक्ष्मी राऊत, जरीना तांबोळी या सर्वांची संचालकपदी वर्णी लागली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा.सौ.मुंढे यांनी काम पाहिले.

बिनविरोध झालेल्या चेअरमन,व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन उपस्थित असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रताप काळे सर,सचिव देवेंद्र जाधवर सर,आदिनाथ देवकते सर,निशांत खारगे सर,अरुण चौगुले सर,तात्यासाहेब जाधव सर,साईनाथ देवकर सर,लालासाहेब शेरे सर,दिपक सर,जि.प व न. प.चे सर्व शिक्षक सभासद बंधू भगिनींने केले.

मा.श्री.दयानंद चौधरी सर यांनी आपली दुसऱ्यांदा संचालक म्हणून व चेअरमन पदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व वरिष्ठ पदाधिकारी,सर्व संचालक मंडळाचे व शिक्षक बंधू भगिनींचे आभार मानले व संस्थेच्या सभासदांचे व संस्थेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेऊन पारदर्शी कारभार करून पतसंस्थेचा नावलौकिक करू असे म्हणाले.