स्वत : कोरोना बाधीत असतानाही काम सुरुच ; तालुक्यात १०० ऑक्सिजन बेडसाठी कामाला लागले आमदार
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी आमदार स्थानिक विकास निधी सन 2021-22 अंतर्गत covid-19 साठी निधी उपलब्ध करून देणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो यांना पत्र दिलेले आहे. त्यानुसार करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अतिरिक्त 20 ऑक्सिजन बेड तयार करणे , जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय येथे 20 ऑक्सिजन बेड ची सुविधा तयार करून स्टाफ ची नियुक्ती करणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी -10 बेड , जिंती – 30 बेड, वरकुटे – 10 बेड तसेच जेऊर येथील जुन्या इमारतीमध्ये 10 बेड साठी ची ऑक्सिजन सेंट्रल लाईन तयार करून आवश्यक साहित्य व साधन सामग्री तातडीने पुरवठा करून प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांना वापरता येतील यासाठी आवश्यकतेनुसार आमदार स्थानिक विकास निधी वापरण्यात यावा अशा आशयाचे पत्र आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे.

आमदारांच्या स्थानिक विकास निधी मधून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 60 गाध्या,60 खाट खरेदी करणे , 60 बेडसाठी नवीन सेंट्रल ऑक्सीजन लाईन तयार करणे ,करमाळा व जेऊर येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दोन मशीन खरेदी करणे , जेऊर येथे बायोमेडिकल वेस्ट , बकेट सिस्टीम व बॅग तसेच रुग्णांची रिपोर्ट व रेकॉर्ड अद्यावत करण्यासाठी संगणक व प्रिंटर खरेदी करणे, ग्रामीण रुग्णालय जेऊरसाठी पाणी पुरवठा व ऑक्सीजन सिलेंडर करिता शेड तयार करणे इत्यादी साठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

देशासह राज्यात सध्या लसीचा तुटवडा ,रेमडेसिविर इंजेक्शन , ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याबाबत मतदारसंघातही उलटसुलट चर्चा होत असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून या सर्व सुविधा तालुक्याला मिळविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे .कोरोनातून बरे झाल्यानंतर मी तालुक्याच्या भेटीला येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.