सालसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा समाचार
सालसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनपर तसेच चित्रपटाच्या गीतांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, पालक आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत जवळपास 70 हजार रुपयांची बक्षीसे दिली. तसेच यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी शाळेला दोन स्मार्ट टी.व्ही. तर अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी सीसीटीव्ही देण्याचे जाहीर केले.

यावेळी उद्योजक सुभाष ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, उद्योजक भरत अवताडे, अशोक सालगुडे, सरपंच सतीश ओहोळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव घाडगे, मेजर हनुमंत कुंभार, प्रशांत सालगुडे, बापू भोसले, तानाजी लोकरे, सुधीर कळसाईत आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

पोपट परदेशी यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश रुपनर, उपाध्यक्षा प्रियंका लोकरे, सदस्य नागेश ओहोळ, जावेद मुलाणी, संतोष पन्हाळकर, कोमल कळसाईत, अर्चना माळी, कोमल पवार, गीतांजली काळे, नवनाथ पवार, संगीता हांडे, शुभम कोळी, मुख्याध्यापिका शितल कांबळे, उपशिक्षक विकास माळी, अजित कणसे, उपशिक्षिका माधुरी मोरे, वृषाली सोरटे तसेच जयराम सांगळे, गणेश आडेकर, विजयकुमार गुंड, धनंजय दिरंगे आदींनी परिश्रम घेतले.