करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावकाराने परस्पर जमीन विकली ; शेतकऱ्याला नव्या मालकाची शिवीगाळ त्रासाला कंटाळुन औषध पिले

करमाळा समाचार (karmala samachar)

सावकाराने जमीन दुसऱ्याला विकल्यानंतर शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्यानंतर वरकुटे येथील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. त्यांचा तीन दिवसाने दि २३ रोजी उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. नातेवाईकांनी कुर्डुवाडी पोलिस ठाणे गाठले त्यानंतर तेथील पोलिसांनी लोकांचा राग शांत करत करमाळा पोलिसात तक्रार देण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर एका महिलेसह सात जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नसीर पठाण (वय ६०) रा. वरकुटे ता. करमाळा असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव हांडे, सुंदर हांडे व अंकुश हांडेसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील बाळासाहेब ढावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यास करमाळा न्यायालयाने सोमवार पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात अझरुद्दीन नसीर पठाण वय २५ वर्षे रा.पठाण वस्ती वरकुटे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, पठाण कुटुंबीय हे वरकुटे ता. करमाळा येथील रहिवासी आहेत. शेतीकरुन ते आपली उपजीविका भागवतात. २०१५ व २०१६ मध्ये नासिर पठाण यांनी गावातील अंकुश हांडे यांच्याकडे वैयक्तिक कारणासाठी पैशाची मागणी केली होती. त्यावर हांडे यांनी शेती नावावर केल्यावर ३ टक्क्याने दोन टप्प्यात तीन लाख रुपये दिले होते. सुरवातीला ६० आर व नंतर ३६ आर अशी जमीन हांडे यांच्या पत्नी सुंदर यांच्या नावे केली होती.

त्यानंतर वेळोवेळी हांडे कुटुंबीयानी व्याज देत असतानाही पैशासाठी तगादा लावला व शिवीगाळ चालु केली शिवाय पैसे लवकर दिले नाही तर जमीन दुसऱ्याच्या नावे करण्याच्या धमक्या देत असत. दि. ३० जानेवारी रोजी शेतामध्ये शेतीकाम करत असताना अंकुश हांडे व त्यांचे सोबत तीन ते चार अनोळखी इसम घेवुन आले व शेतीची मोजणी करु लागले. त्यास विचारणा केली असता व्याजापोटी दिलेल्या रकमेच्या मोबदल्यात आमच्या नावावरची ९६ आर एवढी शेती ही पठाण यांना विश्वासात न घेता अंकुश हांडे यांनी परस्पर प्रविण खोचरे रा. कनेरगाव ता. माढा जि.सोलापुर याचे नावे केलेली आहे असे सांगितले.

नंतर दि २० फेब्रुवारी खोचरे यांच्यासह करमाळा तालुक्यातील भोगेवाडी येथील तीन अनोळखी लोकांना घेऊन आले. व नजीर पठाण यांना शिवीगाळ करुन दमदाटी करु लागले. शेत आमच्या नावावर केले आहे. इथुन निघुन जावा नाहीतर जिवंत सोडणार नाही अशा धमक्याही दिल्या यामुळे नासिर पठाण हे तणावाखाली गेले त्यांनी त्याच दिवशी विषारी औषध पिले. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना आम्ही कुर्डुवाडी येथील डॉ. साखरे यांचे हॉस्पीटल मध्ये दुपारी अंदाजे ३ वाचे आसपास दाखल केले. यांचेवर औषधोपचार चालु असताना ते औषधोपचारा दरम्यान दि २३ रोजी मयत झाले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.

#karmala #kurduwadi #varkute #police

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE