करमाळासोलापूर जिल्हा

सोलापुर जिल्ह्यातील १४६ तर करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायती निवडणुका जाहीर

समाचार टीम

माहे आक्टोंबर 2022 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून १४६ गावात सदरची निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

पोंधवडी, शेलगाव (वा), पारेवाडी, दिवेगव्हाण, गोयेगाव, खातगाव, कात्रज, कोंढार चिंचोली, अंजनडोह, विहाळ, मोरवड, देलवडी, कुंभारगाव, लिंबेवाडी, वंजारवाडी, टाकळी, खडकी, भिलारवाडी, हिंगणी, पोमलवाडी, जिंती, वरकटणे, दहिगाव, वाशिंबे, सोगाव, मांजरगाव, रिटेवाडी, पोफळज, कामोणे, तरडगाव आदि ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE