करमाळासोलापूर जिल्हा

… या कारणामुळे एका वृत्तपत्राने नेत्यांचे चेहरेच झाकले ; तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणुन काळजी घ्या

करमाळा समाचार 

आताच्या करोना काळातही काही महान राजकीय नेते आणि पदाधिकारी मास्क न लावता आणि बेजबाबदार पद्धतीने फिरून बातम्यात येण्यासाठी आटापिटा करीत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही निवडणूक प्रचारात फोटोमध्ये बेस्ट दिसण्यासाठी मास्क न लावल्याचे आढळले आहे.

तोच ट्रेंड नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारला आहे. त्यालाच टोला म्हणून दिव्य मराठी या दैनिकाने थेट भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चेहरे झाकले आहेत.

जिल्हाधिकारी कार्याकालयात करोना आढावा बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. त्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार बबनराव पाचपुते, पोलिस अधीक्षक मनोज पाटील,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र गंधे, प्रसाद ढोकरीकर,अॅड. अभय आगरकर,मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा या सर्वांनी मास्क लावले होते. मात्र, त्याचवेळी दरेकर आणि कर्डिले यांनी मास्क लावणे टाळले होते.

सदरच्या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, प्रवीण दरेकर, शिवाजी कर्डिले खुर्ची पद मिळाल्याने कोई जबाबदार होत नाही. तुम्ही मास्क काढला आम्ही जे जबाबदार चेहरे फोटातून काढतोय.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE