करमाळासोलापूर जिल्हा

एक पद, एक झाड या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण

संजय साखरे – प्रतिनिधी


सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या एक पद, एक झाड या मोहिमेअंतर्गत आज वटपौर्णिमा निमित्त जिंती ता .करमाळा येथील आयुर्वेद दवाखाना परिसरात जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ .सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित लोकांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले.

यावेळी सरपंच संग्राम राजे भोसले, पृथ्वी राज राजेभोसले, उपसरपंच गोरख भोसले,ग्रामपंचायत सदस्य हरीचंद्र वरगड, ड्रा बाबासाहेब गाढवे,मुख्याध्यापक संतोष जगताप,किसन लालगे,नाना वाघमोडे, श्याम ओंभासे,सौ,बबिता राशीनकार, आशा वर्कर सौ थोरात,सौ,धीवर,विनोद चव्हाण,कचरे मामा,मोहन राऊत आदी उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE