युवती राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना करमाळा तालुक्याचे आ.मा. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल निवास , आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय या ठिकाणी शुक्रवारी निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली.

युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सौ शितल शिरसागर यावेळी बोलताना म्हणाल्या की , देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच महिलांच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत घेतलेले निर्णय आणि राबवलेली धोरणे आपण महिलांपर्यंत पोचवणार आहोत .

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष सौ नलिनी जाधव, सौ नंदिनी लुंगारे, शहराध्यक्ष सौ. राजश्री कांबळे,सौ. रूपाली अंधारे, युवती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शितल शिरसागर कार्याध्यक्ष कु. स्नेहल अवचर, सौ वंदना ढेरे, कु.संस्कृती बागल, सौ पल्लवी रणशृंगारे , सौ माधुरी भोगे , सौ मनीषा झिंजाडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री प्रशांत पाटील, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत ,सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल आदी उपस्थित होते.