संदिप शिंदे यांच्या नवीन गाण्याला मिळतोय प्रचंड प्रतिसाद
करमाळा समाचार
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित गीत, संगीत, गायन संदिप पाटील, कृष्णा जाधव यांनी केलेल्या प्रसिध्द (लाँच) गाण्यांना swarsandip या चॅनेल द्वारे महाराष्ट्रात धुमाकूळ संगीत संयोजन प्रफुल्ल दामोदरे व तौफिक पठाण यांनी केले आहे.

आदरणीय नागेश दादा कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील दोन गीतांचे उद्घाटन(लॉन्च)करण्यात आले होते.

यावेळी माननीय ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव भोसले,युवराज जगताप,शरद पवार,दत्ता आल्हाट,दीपक ओहोळ साहेब,नंदकुमार कांबळे बाळू,भीमराव कांबळे बौद्धाचार्य प्रशांत कांबळे, सावताहारी कांबळे,प्रसंजीत कांबळे,दत्ता बडेकर,सुहास ओहोळ,विजय वाघमारे,नाना कांबळे बामसेफ चे सर्व पदाधिकारी रणजित कांबळे सिद्धार्थ कांबळे,नामदेव वाघमारे,भीमराव कांबळे सर आदी मान्यवर उपस्थित होते
लेखक/गीतकार यांनी महापुरुषांचे समानतावादी विचार मांडून प्रबोधन करणं आवश्यक होते, परंतु फक्त जातीच्या नावाने गाणी बनवून you tube चॅनेलचे व्ह्यूज वाढवण हाच ट्रेंड सुरू आहे. याला कुठे तरी ब्रेक लागावा या हेतूने आम्ही अण्णाभाऊ महाराष्ट्रा हिरा व अण्णाभाऊ महाराष्ट्राचा साहित्य सम्राट खरा ही दोन्ही गाणी लाँच केली आहेत सर्वांनी swarsandip या you tube चॅनेल वर पहा
– संदिप पाटील, गायक, करमाळा.