करमाळासोलापूर जिल्हा

पोलिसांना हाताशी धरुन बेकायदेशीर कारवाई ; करमाळ्यात भाजपाच्या वतीने निषेध

 

करमाळा प्रतिनिधी – अमोल जांभळे 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणेसाहेब यांना राज्य सरकारने केलेली अटक ही राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे. भाजपाच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे अगोदरच दोन ते तीन दिवस जनादेश यात्रेच्या विरुद्ध मुंबई मध्ये ४० च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले. याचाच पुढचा सुडाचा अध्याय म्हणून कायद्याला धाब्यावर बसवून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे ही अटक करण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करणारे निवेदन करमाळा तालुका व शहर, भाजपा च्या वतीने करमाळा तहसीलदार श्री समीर माने साहेब यांना दिले.

जाहीरात संपर्क – 8080648552

या झालेल्या घटनेचा करमाळा तालुका व शहर भाजपा च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल, रेल्वे बोर्ड सदस्य दीपक चव्हाण, संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर, माजी अध्यक्ष संजय घोरपडे, व्यापारी आघाडी चे जितेश कटारिया, सचिन चव्हाण, संजय जमदाडे, गणेश वशिंबेकर, लखन चिरके, आदित्य शहाणे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस मयूर देवी, शहर युवा मोर्चा कोषाध्यक्ष तेजस बोकन, देविदास नष्टे, संतोष कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE