करमाळासोलापूर जिल्हा

तरं….आवताडे भाऊंनी राजसाहेबांचे शिलेदार व्हावे… संजय (बापु) घोलप

करमाळा 


करमाळा तालुक्यातील शिवसेना जि.उपाध्यक्ष मा.भरत (भाऊ)आवतडे यांनी नुकताच शिवसेना जि.उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पत्रकार परिषदेत घेतली त्यामध्ये त्यांनी स्थानिक गटबाजी ला कंटाळून व त्या पदाला न्याय देता येत नसुन शिवसेना जि.उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असे सांगितले यांची करमाळ्यातील जिल्हापरिषद पंचायत समिती च्या जवळपास आलेल्या निवडणुकीत मोठा धक्का शिवसेना ला बसला अशी चर्चा करमाळा तालुक्यात चालू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका व शहर हि मा.भरत (भाऊ)आवताडे यांचे सामाजिक काम जाणुन आहे गोरगरीबांना नेहमीच मदत करणारे व नेहमीच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणुन त्यांची ओळख आहे म्हणुन आवताडे भाऊंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,या पक्षात येऊन पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांचे शिलेदार व्हावे अशी मागणी मा.भरत (भाऊ)आवताडे यांना आज भेट घेऊन करणार आहोत असे मा.संजय (बापु)घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा यांनी असे सागितले.

पुढे बोलताना घोलप म्हणाले कि हिंदुहद्यसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून शाखा अध्यक्ष ते जि.उपाध्यक्ष झालेले आवताडे हे कोण्याताही दुसर्या पक्षात किंवा गटात त्यांना जाऊन मानसिक समाधान मिळणार नाही कारण ते हिंदुह्द्यसंम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सैनिक आहेत त्यामुळे त्यांनी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे शिलेदार व्हावे त्यांचे आम्ही करमाळ्यातील मनसे सैनिक व पदाधिकारी आम्ही सर्व स्वागत करेल व त्यांनी मनसे पक्षात येऊन प्रवेश करतील अशी इच्छा..मनसे तालुकाध्यक्ष या नात्याने व्यक्त करतो.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे,किरण,कांबळे,सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे,योगेश काळे,स्वप्निल कवडे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE