करमाळासोलापूर जिल्हा

ठाकरे शिंदे भेटीमागे सय्यद यांना दोन भाजपा नेत्यांचे सहकार्य ; शिंदे ठाकरे भेटीचे संकेत

राजकीय –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. अनपेक्षित पणे मुख्यमंत्र्याची माळ ही शिंदेंच्याच गळ्यात पडली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाल्याचे शिंदे वारंवार सांगत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकदा शिंदे व ठाकरे यांनी हे ठरवून तर केले नसावे असा संशय बऱ्याचदा व्यक्त केला जात होता. पण जसं जसं दिवस पुढे जात होते तसे वेगवेगळ्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे दिसून येत होते. पण आता पुन्हा एकदा शिवसेना एकत्र येते असे दिसून येत आहे. नुकतेच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या एका ट्विट मुळे याचे संकेत मिळू लागले आहेत.

दिपाली सय्यद या मागील तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तर आपल्या ट्विटर अकाउंट वरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे असे ट्विटही केलेले होते. यातच शिवसेनेकांचा भावनांचा आदर करावा असेही त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे ही भेट घडून देण्यात दिपाली सय्यद मध्यस्ती करत असल्याचेही दिसून आले होते. त्यातच त्यांनी मागील तीन दिवसांपूर्वी शिंदे यांची भेट घेतल्यामुळे या भेटीमागे काहीतरी दडले असे दिसून येत होते.

भेटीचे कारण या ट्विट मत मधून स्पष्ट होत होते… मा.द्रोपती मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणुन उद्धव साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तश्याच प्रकारचा पाठिंबा आदरणीय शिंदेसाहेबांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन मिळावे या करीता शिंदेसाहेबांनी मातेश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी याकरीता आज (तीन दिवसापुर्वी) भेट होईल.

तर शनिवारी दिपाली सय्यद यांनी नवीन ट्विट केल्याने त्यातून लवकरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे असे सूचक वक्तव्य करण्यात आले आहे.
दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून य़ाबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद असं म्हणत भाजपाचे देखील आभार मानले आहेत. “येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल” असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

सदरची ट्विट करत असताना दिपाली सय्यद यांनी भाजपा नेत्यांनी मध्यस्थी केली त्यामुळे त्यांचे धन्यवाद ही मानले आहे. पण हे भाजपाचे नेते कोण असा प्रश्न समोर आला आहे. मुळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध टाणले गेल्यामुळे ते असा प्रयत्न करतील का असा प्रश्न होता. पण दिपाली सय्यद यांच्याच ट्विटमधूनच ते भाजप नेते कोण असावेत याचेही संकेत मिळत आहेत. दिपाली सय्यद यांनी केलेले ट्विट व त्याला टॅग केलेले नेते यामध्ये श्री उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचा दोन नेत्यांना टॅग केले आहे, ते म्हणजे माजी मंत्री विनोद तावडे व भाजपाने नेत्या पंकजा मुंडे या दोन नावांचा समावेश आहे.

अधिकृत रित्या अद्याप भेट कधी होईल याची स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी त्या ट्विटमधून दोन्ही नेते भेट घेणार आहेत हे नक्की होत आहे. त्यावरून आता समाज माध्यमातून त्या बाजूनेही टीका होऊ लागल्या आहेत “हे तर होणारच होते” असे लोक म्हणू लागले आहेत. नेमके काय होईल हे येणारा काळच सांगणार आहे. पण दरम्यानच्या काळात वाढलेला ताणतणाव भेटीतुन कमी झाला तरी मन दुरावले ते जवळ कसे येतील याकडे लक्ष राहिल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE