करमाळासोलापूर जिल्हा

तरटगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निर्मला वाळुंजकर यांची बिनविरोध निवड

करमाळा : अमोल जांभळे –

तरटगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निर्मला वाळुंजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी (ता. १९) तरटगाव ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड झाली. निवडीनंतर कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड बिनविरोध झाली आहे.

उपसरपंचपदी निवड झालेल्या वाळुंजकर या माजी उपसरपंच अरुण वाळुंजकर यांचीच्या सून व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाजपचे तालुका चिटणीस किरण वाळुंजकर यांच्या पत्नी आहेत. उपसरपंच वाळुंजकर या जिजामाता बचत गटाच्या अध्यक्षही आहेत. वर्षा नलवडे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले. त्यानंतर सरपंच डॉ. घाडगे यांच्या नेतृत्वाखालीहि निवड बिनविरोध झाली. माजी उपसरपंच नलवडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

निवडीनंतरनवनियुक्त उपसरपंच वाळुंजकर यांचा सत्कार सुरेखा नानासाहेब घाडगे यांनी व उपस्थित महिला सदस्यांनी केला. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक अजित देवकर यांनी काम पाहिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE