करमाळासोलापूर जिल्हा

लोकशाही साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अभिवादन

करमाळा प्रतिनिधी


मराठी साहित्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहील्या. आण्णाभाऊ साठे यांची पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते आणि समृद्ध लेखन साहित्य सामूग्री आजही सर्वत्र उपलब्ध आहेत. तमाशाला सांस्कृतिक लोककलेचा वारसा मिळवून देण्याचे श्रेय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जाते असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी जयंतीनिमित्त मांडले.

लोकशाही आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने करमाळा येथे पूर्णाकृत पुतळ्यास पुष्प हार घालून साजरी करण्यात आली. जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तारलेली नसून शोषित वंचित श्रमिकांच्या हातावर तारलेली आहे असे ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शिवरायांचा पोवाडा रशियात गाईला, फकिरा कादंबरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणी ला अर्पण केला आपल्या लेखणी व पोवाडे मधून समाज जनजागृतीचे चळवळ उभी केली आसे देवकते यांनी म्हटले आहे.

यावेळी सुहास ओहोळ, रासप शहराध्यक्ष विलास घोणे, वि.अध्यक्ष शंकर सुळ, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, मातंग समाज अन्याय अत्याचार निवारण संघ संस्थापक अध्यक्ष अमित आल्हाट, संघर्ष न्यूजचे पत्रकार सिध्दार्थ वाघमारे, मातंग एकता अंदोलन शहराध्यक्ष युवराज जगताप, शहराध्यक्ष विलास घोणे, अश्पाक शेख, रासप नेते जिवन होगले, विकास मेरगळ, रघुनाथ खटके, बौध्दाचार्य सावताहारी कांबळे, बौध्दाचार्य प्रशांत कांबळे, गणेश आल्हाट, कृष्णा आल्हाट इत्यादी सह सर्व समाजातील मान्यवर उपस्थितीत होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE