करमाळासोलापूर जिल्हा

विठ्ठलाच्या स्मरणानेच संसारात सुख- ह. भ. प रामराव महाराज ढोक

करमाळा समाचार -संजय साखरे


जन हो, तुम्ही जर या संसारात आला आहात तर, इथे एका सुखाचा आस्वाद नक्की घ्या. आणि ते सुख म्हणजे विठ्ठलाचे नाम घेणे होय. तुम्ही जरी आज संसारात विठ्ठलाचे नाम घेतले तर हा सर्व संसार तुम्हाला सुखाचा वाटेल. आणि दुःखाचा लवलेशही तुमच्या वाट्याला येणार नाही. जे विठ्ठलाचे नाम घेतात त्यांना सुख सोपे आहे. आणि याची सोय खुद्द परमेश्वरानेच करून ठेवली आहे.

या भोळ्या भाबड्या भाविकांना आणि भक्तांना या संसाररूपी भवसिंधूतून तरुन जाण्यासाठी आपल्यावर हे उपकारच परमेश्वराने करून ठेवले आहेत. असे प्रतिपादन ह .भ. प रामराव महाराज ढोक यांनी रात्री सावडी येथील श्री हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तन मालेचे सहावे पुष्प गुंफताना केले.

संसारा आलिया एक सुख आहे l आठवावे पाय विठोबाचे ll
या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर त्यांनी सुंदर विवेचन केले. सावडी येथील हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे निमित्ताने काल रामायणाचार्य ह. भ. प रामराव महाराज ढोक यांची सेवा झाली.

‘श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एका लाडक्या मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून द्यावे’ असा हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा सावडीचा अखंड हरिनाम सप्ताह आहे .असे सुरुवातीलाच सावडीच्या सप्ताहाचे वर्णन करून त्यांनी सावडी करांची मने जिंकली.

या कीर्तनासाठी सावडी आणि पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE