करमाळासोलापूर जिल्हा

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा महेश निकत सर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत

समाचार टीम


शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय super 30 गुणवंत शिक्षक पुरस्कार मध्ये महेश निकत सर यांची निवड करण्यात आली.

त्यानिमित्त रविवारी 4 सप्टेंबर रोजी मेडिकोज गील्टस् भिकोजी तांबे सभागृह बारामती येथे त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी डॉ.एच. आर. भापकर M.sc SET Ph.D (Maths) प्रसिद्ध सशोधक व गणित तज्ञ , डॉ. नीरजकुमार शहा B.E.Civil M.Tech Gold medalists आत्मिक एज्युकेशन पुणे आणि केशवराव आनंदराव शितोळे , संस्थापक उत्कर्ष ग्राम शिक्षण संस्था कुरकुंभ व इतर सर्व सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

शब्दधन सोशल फाउंडेशन ही संस्था निती आयोग या भारत सरकारच्या संस्थेत नोंदणीकृत भारत सरकार सूक्ष्म , लघु एव मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत संस्था आहे
हा सन्मान मला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणा देईल असे महेश निकत सर यांनी यावेळी सांगितले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE