पोलिस झालेल्या देवळालीतील तरुणांची गावातुन मिरवणुक ; करमाळ्यातील युवकांचाही झाला सन्मान
देवळाली:
येथील दोन होतकरू तरूण कुमार आव्हाड व अनिकेत गूंड मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्या निमित्त येथील ग्रामस्थ, मित्र परिवार यांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्कारापूर्वी या दोन यूवकांची गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
नागनाथ मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात राजू घळके, नितिन दामोदरे, दिपक कटारिया, महाराष्ट्र करिअर ॲकॅडमी चे वायकर सर, तात्यासाहेब जगताप गूरूजी, लक्ष्मणराव भोसले , बाळासाहेब गोरे गूरुजी यांची भाषणे झाली.
प्रमूख उपस्थिती म्हणून नागेशदादा कांबळे,सरपंच गहिनीनाथ गणेशकर,माजी नगराध्यक्ष दिपकराव ओहोळ यांची उपस्थिती होती.
यानिमित्ताने गावातील तरूणांनी अधिकाधिक प्रशासकीय सेवेत भरती होण्याच्या दृष्टीने गावात वातावरण निर्मिती करण्याचे व त्यासाठी मार्गदर्शन व साहीत्य पुरविण्याचे गावक-यांनी ठरवले.
आसाम मध्ये प्रशासकीय सेवेत असणारे शशिकांत पवार व मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे मिलिंद दामोदरे यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर स्वप्निल धाकतोडे, अंगद वाघमारे, तुषार रणदिवे हे करमाळा येथील यूवक भरती झाले. त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. कोच हिरालाल पवार यांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल दामोदरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहूल शिंदे, अशोक गायकवाड, नितिन दामोदरे, सुधीर आवटे, रविंद्र दामोदरे, चंद्रकांत साळवे, रोहीत दामोदरे, नागेश दामोदरे, तुषार दामोदरे, संदिप आव्हाड, तात्या दामोदरे, भाऊ दामोदरे, कमलेश दामोदरे इ नी परिश्रम घेतले. भिमसरकार सोशल ग्रूप च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.