करमाळासोलापूर जिल्हा

पोथरे ते संगोबा देवस्थान रस्ता डांबरीकरण करा: नितीनभाऊ झिंजाडे

करमाळा:-

पोथरे ते संगोबा देवस्थान रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी भाजपचे नितीनभाऊ झिंजाडे यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे. खासदार निंबाळकर हे काल करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ही मागणी केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे पोथरे नीलज ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत श्री आदिनाथ महाराजांचे देवस्थान आहे. हे संगोबा या नावाने ओळखले जाते. या देवस्थानच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात तसेच प्रत्येक महिन्याला पोथरे येथून संगोबा येथे दिंडी जात असते पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत हे देवस्थान येत असले तरी पोथरे गावठाण ते संगोबा याठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.

यामुळे अहमदगर, बीड जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे. यावेळी पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा सत्कार खासदार निंबाळकर यांनी केला. यावेळी अफसर (तात्या)जाधव, जातेगांचे सरपंच छगन ससाणे, बालाजी शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE