श्री आदिनाथ साखर कारखान्यावर NCDC बॅंकेचा ताबा दुसरी तयारीत !
करमाळा – विशाल घोलप
श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा एनसीडीसी बँकेने आदिनाथ कारखान्यावर प्रतिकात्मक (कागदोपत्री) ताबा घेण्यात आला आहे. या संदर्भात बँकेने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडे यासंदर्भाचे पत्र पाठवले आहे. सदरचा ताबा ६३ कोटी ७६ लाखाच्या कर्जापोटी घेण्यात आला आहे. यामध्ये ९५ हेक्टर ७४ आर जमिनीसह कारखान्याच्या आचल मालमत्तेवर अप्रत्यक्षरीत्या ताबा घेतला आहे. तर याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी दिली आहे.
श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी दूर होण्याचे नाव घेत नाहीत. डिसेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामात सुरुवात करण्यात आला होता. यावेळी ७७ हजार गाळप झाले होते. तर एप्रिल २०२३ मध्ये कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आले. त्यानंतर प्रशासक मंडळाने कारखाना सुरू केला. परंतु तितकासा व्यवस्थित न चालण्याने केवळ पाच हजार नऊशे गाळप झाल्याचे दिसून आले. सध्या ऊस व वाहतूक दोन्ही मिळून कारखान्याला देणे थकीत आहे. तर कारखाना कर्मचाऱ्यांच्या पगारही थकीत आहेत. आदिनाथ कारखाना पूर्ण क्षमतेने न चालल्याने कारखान्याला नुकसान सोसावे लागले आहे.
दरम्यान एम एस सी बँक व एनसीडीसी बँक या दोन्ही बँकांचे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्ज आहे. तर एम एस सी बॅंकेच्या ओटीएसच्या माध्यमातून रक्कम फेडण्याचे ठरल्यानंतर सदरचा कारखाना हा संचालक मंडळाकडे देण्यात आला होता. पण संचालक मंडळ व प्रशासकीय संचालक मंडळ हप्ते वेळेवर फेडू न शकल्याने आता दोन्ही बँका ताबा घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामध्ये एनसीडीसी बँकेने नुकतेच आदिनाथच्या प्रशासनाकडे पत्र पाठवले आहे. तर एम. एस. सी. बँक ही लवकरच याबाबतची कार्यवाही पूर्ण करेल असे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया
सदरची बाब आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहोत व या संदर्भात योग्य ते कायदेविषयक सल्ला घेऊन निर्णय घेणार आहोत. सभासद व शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाईल.
– महेश चिवटे,
प्रशासकीय संचालक, आदिनाथ
आम्ही एम एस सी बॅंकेचे ओटीएस मध्ये हप्ते भरण्यासाठी मुदत मागितली होती. यावेळी बॅंकेने मुदत वाढऊन दिली होती. दरम्यानच्या काळात प्रशासकीय मंडळ आले व आदिनाथचा ताबा प्रशासकीय मंडळाकडे गेला. यावेळी त्यांनी पुढील हप्त्याची तजवीज करणे अपेक्षीत होते पण तसे न केल्याने सदरची कार्यवाही होत आहे. यामध्ये आपण वरिष्ठांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करु.
– धनंजय डोंगऱे, माजी अध्यक्ष आदिनाथ कारखाना.