कॉग्रेस कडुन प्रताप जगताप यांच्याकडुन मुलाखत
करमाळा
येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने काल सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मा.खा.डॉ. शिवाजीराव काळगेसाहेब यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन सोलापूर येथे घेतल्या. 244- करमाळा विधानसभा मतदार संघातून करमाळा तालुका काँग्रेस (आय ) चे अध्यक्ष श्री. प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांनी मुलाखत दिली. आज पर्यन्त केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी निरीक्षक साहेबापुढे सविस्तर मांडला.
तालुक्यातील गटा-तटाचे राजकारणाला फाटा देऊन काँग्रेस पक्षवाढीच्या दृष्टीने गाव तिथे शाखा या उद्देशातून आज पर्यन्त 52 शाखा तयार करून त्या त्या शाखेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून गोर गरीब जनतेची अडकलेली कामे मार्गी लावण्याचे कार्य केले. शहराच्या ठिकाणी कसबा पुणे येथील मा. आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या शुभहस्ते प्रशस्त असे काँग्रेस पक्षाचे कार्यालय उभा केले. या कार्यालयच्या माध्यमातूनही अनेक लोकांच्या अडी-अडचणी सोडवण्याचे कार्य सुरूच आहे.
वेळोवेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अश्या अनेक विषयावरती आंदोलने, निदर्शने केली. स्व. देशभक्त नामदेवरावजी जगताप साहेब यांनी आपली संपूर्ण हयात काँग्रेस पक्ष वाढीसाठी घालवली. तालुक्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अश्या अनेक शिक्षण संस्था उभा केल्या.तालुक्यातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी यांना मोफत छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहाची उभारणी केली होती. उजनी धरण, मांगी तलाव, अनेक सहकारी संस्था निर्माण करून यासारख्या अनेक महत्वाच्या योजना त्यांनी राबवल्या.
करमाळा तालुका हा स्व. नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या विचारावर चालणारा तालुका असून आपल्याला जर पक्षाने संधी दिली तर आपण पूर्ण ताकतीनीशी करमाळा विधानसभा लढू किंवा पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी भक्कपणे उभा रहाऊ असा विश्वास श्री. प्रतापराव जगताप यांनी या मुलाखती दरम्यान दिला. या मुलाखती मध्ये निरीक्षक मा.खा.डॉ. शिवाजीराव काळगेसाहेब यांच्याशी जवळपास अर्धा तास सविस्तर चर्चा झाली.
1999 व 2014 च्या निवडणुकीतच फक्त काँग्रेस पक्षाने करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्या व्यतिरिक्त कधीच संधी काँग्रेस पक्षाला मिळाली नसून आघाडी मध्ये ही जागा मित्रपक्षाला मिळाली. तरी सुद्धा आपण आघाडी धर्माचे पालन करीत प्रचार केला. परंतु निकाला नंतर काँग्रेस पक्षाला विचारात घेतले जात नसल्याची खंत ही प्रतापराव जगताप यांनी मा.खा.डॉ. शिवाजीराव काळगेसाहेब यांच्या समोर व्यक्त केली. यावेळी निरीक्षक साहेबांनी आपण नक्कीच या सर्व गोष्टी प्रदेश काँग्रेस समोर मांडू असा विश्वास श्री प्रताप जगताप यांना दिला. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री. चेतनभाऊ नरोटे उपस्थित होते.