राष्ट्रवादी (शरद पवार गट ) आज बैठक ; जिल्ह्यातील बदलत्या घडामोडीमुळे विशेष महत्व
करमाळा समाचार
शनिवार दि ७ रोजी करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन सुप्रीम हॉटेल, कुंभेज फाटा, जेऊर रोड येथे करण्यात आले आहे. सदरची बैठक ही दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. जिल्ह्यातील घडामोडी पाहता सदरच्या बैठकीला वेगळं महत्व प्राप्त झाला आहे असे दिसून येते. यासंदर्भात तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी नियोजित बैठक असल्याचे सांगितले.

करमाळा तालुक्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या सर्व विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सदर बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर या संदर्भात बाहेर कोणत्याही चर्चा न करता बैठक बोलण्यात आल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सदर बैठकीच्या निमित्ताने विद्यमान आमदार नारायण पाटील व जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक आयोजित केली गेली आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवत विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी सहज विजय मिळवला होता. त्यानंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही पाटील गडाला झेंडा रोवता आला. दरम्यानच्या काळात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने व तालुक्यातील निधीच्या निमित्ताने पाटील यांचे सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा व बैठका झाल्या. त्याच्या उलट सुलट चर्चाही सुरू होत्या. परंतु पाटील आजही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट माध्यमातून कार्यरत असल्याचे दिसून येते. आजच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांना आमदार पाटील हे मार्गदर्शन करताना दिसतील.
संतोष वारे यांची माहीती ..
पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात सदर बैठकांचे आयोजन केले जाते. यापूर्वी वेगवेगळ्या तालुक्यात तीन बैठका पूर्ण झाल्या असून करमाळा तालुक्यात नियोजित ही चौथी बैठक आहे. या बैठकीला अध्यक्षस्थानी लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार नारायण पाटील तर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे मार्गदर्शन करणार आहेत. फक्त प्रमुख पदाधिकारी बैठक असल्याने इतरांना बोलवण्यात आलेले नाही.
–संतोष वारे, तालुकाध्यक्ष करमाळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट.